About Us
श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपुर (पुर्व इतिहास )
सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले व भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रिमाई फुलेंच्या शिक्षण आणि समाजसेवेतून लोककल्याण संबंधी विचार घेवून, त्याचे क्रांतीकारी विचार माळी समाजातील गरीब व होतकरु भगिनी व बंधु पर्यंत पोहोचवून समाज एकत्रिकरण करणे व समाजाचा सर्वांगीण विकासाकरिता दुर्बल दुर्लक्षितंच्या उद्धाराकरिता आणि वेगवेगळ्या क्षेत्रात विखुरलेल्या समाज बांधवांना सोबत घेवून सकल समाजाचा विकास साधने या प्रमुख उद्देशाने ३ जानेवारी १९६७ ला संस्था स्थापन केली व दि २२ फेब्रूवरी १९६८ रोजी सोसायटी रजि नं, अॅक्ट न. १८६० अन्वये कायदेशीर श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपुर या नावाने नोंदणी करण्यात आली.