श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपुर (पुर्व इतिहास )

सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले व भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रिमाई फुलेंच्या शिक्षण आणि समाजसेवेतून लोककल्याण संबंधी विचार घेवून, त्याचे क्रांतीकारी विचार माळी समाजातील गरीब व होतकरु भगिनी व बंधु पर्यंत पोहोचवून समाज एकत्रिकरण करणे व समाजाचा सर्वांगीण विकासाकरिता दुर्बल दुर्लक्षितंच्या उद्धाराकरिता आणि वेगवेगळ्या क्षेत्रात विखुरलेल्या समाज बांधवांना सोबत घेवून सकल समाजाचा विकास साधने या प्रमुख उद्देशाने ३ जानेवारी १९६७ ला संस्था स्थापन केली व दि २२ फेब्रूवरी १९६८ रोजी सोसायटी रजि नं, अॅक्ट न. १८६० अन्वये कायदेशीर श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपुर या नावाने नोंदणी करण्यात आली.

संस्थेच्या पहिल्या कर्यकारिणी मघ्ये
अध्यक्ष - श्री धुंडीराज मोहुर्ले, गंजीपेठ, नागपुर   &सचिव - श्री महादेवराव चतारे, राजाबाक्षा, नागपुर

सदस्य -श्री केशवराव लेंडे, जुनी शुक्रवारी, नागपुर श्री वसंतराव कोटरंगे, लाकडीपुल, नागपुर श्री क्रिष्णाजी वसाके, नवी शुक्रवारी, नागपुर श्री रामाजी गाऊत्रे, काशीबाई मंदिर, महाल, नागपुर श्री नत्थुजी शेंडे, अजनी, नागपुर श्री गंगाघरराव चहारे, जटपुरा गेट, चंद्रपुर श्री केशवराव ठाकरे, नवरगांव, यवतमाळ श्री कमलनाथ ढोले, आष्टी श्री नानदेवराव निकुळे, अढ्याळ, जि भंडारा

यांनी कार्यभार सांभाळला…
व संस्थेची वाटचाल सुरु झाली…
श्री महादेवराव चतारे यांनी दिवस रात्र मेहनत घेत समाजकार्यात मोलाचा वाटा दिला. यांच्या साथीला खांद्याला खांदा देत श्री गंगाधरराव चहारे, श्री केशवरावजी लेंडे, श्री रामाजी गाऊत्रे, श्री कमलनाथजी ढोले, श्री युगेश्वर वसाके, श्री शंकररावजी ढोले, श्री विजय बोरुले, श्री बाळकृष्ण लोनबले, श्री रामाजी मोहुर्ले, श्री उदयभान कोकुडे, श्री देवराव निकोडे, श्री मारेातराव गाऊत्रे, श्री वासुदेवराव कोटरंगे, श्री मधुकरराव गुरनुले, श्री सदाशिवराव महादुरे, डॅा. पी. एन. चौधरी, श्री दयारामजी निकुळे, श्री चंपतरावजी शेंडे यांनी संस्थेचे कार्य पुढे नेले. समाज भूषण, शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रसिद्ध उद्योगपती श्री सदाशिवराव महादुरे यांच्या पुढाकाराने संस्थे ला समाज बंधू श्री चंपतरावजी शेंडे यांचे मालकीचे उमरेड रोड वरिल मौजा गोण्ही, ग्राम पंचायत बहादुरा, (नागपुर ग्रामिण) येथिल ६१३८ चौ. फुटाचा भुखंड दि १२ अॅाक्टोंबर १९९० ला श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ, नागपुर संस्थेच्या नावे खरेदी करुन देण्यात बहूमोलाचा वाटा आहे.

आता पर्यंत या संस्थेला अनेक समाज बांधवांनी बहुमोलाचे कष्ट करित अनेक उपक्रम राबवली व पुढे आणन्याचा प्रयत्न केले आहेत. यात श्री गोविंदराव महादुरे, श्री प्रभाकरराव जेंगटे, श्री पुरुषोत्तम गुरनुले, श्री शिवरामजी गुरनुले, श्री रामेश्वर निकोडे, श्री मारोती शेंडे(PI), श्री विश्वास महादुरे, श्री एकनाथ चौधरी, श्री प्रदिप मांदाडे, श्री पुंडलिकराव कावडे, श्री केशवराव सोनुले, श्री नामदेवराव शेंडे, श्री विष्णू मोहुर्ले, श्री अशोकराव निकोडे, श्री नरेश मोहुर्ले, सुहास चहारे, सौ. मंदाताई विष्णू मोहुर्ले, महादेवराव गाऊत्रे, रंजितभाऊ सोनुले यांनी संस्थेला मोलाचे योगदान दिले. े.

सन् २०१० मध्ये श्री विश्वास महादुरे यांच्या अध्यक्षते खाली वधु वर परिचय व गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला. यांच्या कारकीर्दि मघ्ये समाजाच्या प्लॅाट वर संरंक्षण भिंती चे कार्य करण्यात आले, श्री महादुरे परिवार नागपुर तर्फे स्व सदाशिवराव महादुरे स्मृती प्रित्यर्थ प्रवेश गेट व विहिरी चे बांधकाम करण्यात आले

सन् २०१७ मध्ये श्री ईश्वर ढोले यांच्या अध्यक्षतेत
उपाध्यक्ष- श्री अशोकराव गुरनुले
सचिव- श्री रंजित सोनुले
सह सचिव- श्री अशोकराव लेंडे
कोषाध्यक्ष - श्री क्रिष्णा महादुरे
कार्यकारिणी सदस्य-
श्री युगेश्वर वसाके, रामेश्वर मोहुर्ले, श्री प्रदिप मांदाडे, सौ. संगिता मांदाडे, श्रीमती. कुसुमताई सोनुले

यांचे सह सांस्कृतिक समिती-
श्री विष्णू शेंडे, श्री मंगेश ठाकरे, श्री किशोर शेंडे, श्री आशिष चौधरी, श्री राजुभाऊ वाढई, श्री अरुणभाऊ सोनुले,
श्री तुळशिरामजी वाटगुळे, श्री चंद्रशेखर मांदाडे.
स्थापित करण्यात आली

क्रमशः…!