जीवन ज्योती परिचय मेळावा २०२७
श्रीक्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ), नागपूर द्वारे आयोजित
समाजातील उपवर-वधू युवक-युवतींना अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी आणि पालकांना योग्य स्थळ शोधण्यास मदत करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ.
समाज एकत्रीकरणाचा नवा टप्पा
श्रीक्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्था ही समाज एकत्रिकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. संस्थेद्वारे माळी समाजातील उपवर-वधू युवक-युवतींचा परिचय करून देण्यासाठी संस्थेच्या जय जोती सांस्कृतिक सभामंडपात “परिचय मेळावा २०२७” आयोजित करण्यात आलेला आहे.
या मेळाव्यात विदर्भातील सर्व प्रमुख जिल्ह्यांमधील समाजबांधवांच्या संपर्कात राहून, संस्थेद्वारे नियुक्त जिल्हा प्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे समाजबांधवांना व पालकांना योग्य स्थळ शोधायला मोलाची मदत होणार आहे.
आयोजनामागील पार्श्वभूमी
आजच्या आधुनिक युगात उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे स्वतःचे स्वतंत्र विचार असतात. माहितीच्या अभावामुळे योग्य स्थळ शोधणे पालकांसाठी कठीण जाते आणि वाढत्या वयामुळे पालकांवर मानसिक ताण येतो.
"पत्रिका, गुण, गोत्र आणि वधू-वरांचे मन... हे जुळवणे म्हणजे तारेवरची कसरत असते. मन जुळले की पत्रिका नाही आणि पत्रिका जुळली की मन!"
उपवर-वधूंची निवड करताना अचूक माहिती मिळणे अत्यंत गरजेचे असते. समाजाला भेडसावणाऱ्या या समस्येवर सकारात्मक उपाय म्हणूनच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नोंदणी कशी करावी?
आपण आपल्या संबंधित जिल्हा प्रतिनिधींमार्फत संपर्क साधून माहिती देऊ शकता किंवा थेट अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Online नोंदणी पूर्ण करू शकता.
जिल्हा निहाय नियोजन समिती
जिल्ह्यानुसार प्रतिनिधींची माहिती पाहण्यासाठी खालील टॅबवर क्लिक करा
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
14 संपर्क उपलब्धश्री. अरुणभाऊ सोनुले
संयोजकश्री. प्रदिपभाऊ मांदाडे
सह संयोजकश्री. पंकजभाऊ मोहुर्ले
सह संयोजकश्री. तुळशिरामजी वाटगुरे
समिती सदस्यश्री. बाळकृष्णाजी गुरनुले
समिती सदस्यश्री. रामेश्वरराव मोहुर्ले
समिती सदस्यश्री. अशोकराव गुरनुले
समिती सदस्यश्री. क्रिष्णाजी ढोले
समिती सदस्यश्री. राजेन्द्रभाऊ ठाकरे
समिती सदस्यश्री. राजेन्द्रभाऊ वाटगुरे
समिती सदस्यश्री. रमेशराव नागोशे
समिती सदस्यसौ. अल्काताई शेंडे
समिती सदस्यसौ. भारतीताई लेंडे
समिती सदस्यसौ. विजयाताई आदे
समिती सदस्यसहकार्याचे आवाहन
संस्थेचे हे सकारात्मक पाऊल तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्याने एक सामाजिक सेवा म्हणून समाजाला समर्पित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपण सर्व समाजबांधवांना नम्र विनंती आहे की आपण या उपक्रमाची माहिती सर्वदूर पोहोचवावी. आपल्या संपर्कात आलेल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि हितचिंतकांना याची कल्पना द्यावी, जेणेकरून संस्थेचा समाजोपयोगी उद्देश साध्य करण्यात आपले मोलाचे योगदान राहील.